'स्पर्श' - अनोख्या सफरींची सुरवात
२८ डिसेंबर २०२५ रोजी पुण्यामध्ये जर्मनीस्थित अजित रानडे यांच्या ‘स्पर्श’ या अनोख्या सहलींसाठीच्या कंपनीची घोषणा झाली. ‘स्पर्श’ तर्फे भारतातून यूरोपमध्ये जाणाऱ्या उत्साही प्रवाश्यांना थोड्या हटके असणाऱ्या ठिकाणांची सहल घडवण्यात येणार आहे. तसेच युरोपमधून भारतात आरोग्य उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना सर्वप्रकारची सोय उपलब्ध होणार आहे.
अजित रानडे हे गर्जे मराठीशी अनेकवर्षांपासून जोडलेले असून, त्यांचा हा अतिशय महत्वाचा कार्यक्रम गर्जे मराठीच्या पुण्यातील कार्यालयात पार पडला. या कार्यक्रमासाठी ख्यातनाम लेखक श्री. वसंत वसंत लिमये हे प्रमुख पाहुणे होते. गर्जे मराठीतर्फे माधव दाबके, विश्वास गोखले, प्रसाद डफळापूरकर उपस्तित होते.
